पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक्स गर्लफ्रेंड प्रियांकाला शाहिदचा सल्ला

एक्स गर्लफ्रेंड  प्रियांकाला शाहिदचा सल्ला

अभिनेता शाहिद कपूरनं त्याची कथीत एक्स गर्लफ्रेंड प्रियांका चोप्रा आणि निक जोनासला सल्ला दिला आहे. 'कमिने' चित्रपटाच्या वेळी प्रियांकाचं नाव शाहिदशी जोडलं होतं. नेहा धुपियाच्या चॅट शो दरम्यान  शाहिद कपूर आला होता. यावेळी निक- प्रियांका या जोडप्याला शाहिदनं सल्ला दिला आहे. 

राणादाचा कुस्तीला तात्पुरता रामराम, झाला पोलिसांत भरती

एकमेकांना  समजून घ्या, एकमेकांची पार्श्वभूमी समजून घ्या असा सल्ला विवाहित जोडप्याला शाहिदनं दिला आहे. निक आणि प्रियांका हे दोघंही २०१८ साली विवाहबंधनात अडकले. निक आणि प्रियांका या दोघांमध्ये वयाचं बरंच अंतर आहे. निक  अमेरिकन गायक आहे. त्या दोघांची पार्श्वभूमी खूपच वेगळी आहे, त्यामुळे शक्य तितकं एकमेकांना समजून घ्या,  जास्तीत जास्त एकमेकांविषयी जाणून घ्या असा सल्ला शाहिदनं दिला आहे. 

दोन वर्षांनंतर बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टी

निक आणि प्रियांका  एकमेकांना  डेट करत होते. त्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली. राजस्थानमध्ये पारंपरिक भारतीय आणि ख्रिश्चन पद्धतीनं या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.