पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहिद- मीरा राहणार वरळीच्या आलिशान घरात?

शाहिद कपूर- मीरा राजपूत

'कबीर सिंह' चित्रपटाच्या यशामुळे अभिनेता शाहिद कपूर सध्या चर्चेत आहे. तो लवकरच पत्नी मीरा राजपूत सोबत आपल्या नव्या आलिशान घरात राहायला जाणार आहे अशा चर्चा आहेत. 

शाहिदनं वरळीतल्या एका टोलेजंग इमारतीत २०१८ मध्ये घर घेतलं होतं. हे घर आता पूर्णपणे तयार झालं आहे. वर्षाअखेरीस तो आपल्या नव्या आलिशान घरात रहायला जाणार अशा चर्चा आहेत. मुंबई मिररच्या माहितीनुसार शाहिदनं  ८ हजार स्वेअर फूटचं घर खरेदी केलं होतं. या घराचा ताबा आता त्याला मिळणार आहे. 

गणेशोत्सव २०१९ : घरीच बाप्पांची मुर्ती तयार करणार मराठी कलाकार

शाहिदचं घर वरळीतल्या आलिशान भागात आहे. दीपिका पादुकोन, विराट कोहली, युवराज सिंह यांसारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींची घर याच परिसरात आहेत. डीएनएच्या माहितीनुसार या घराची किंमत तब्बल ५६ कोटी आहे. शाहिदनं २.९१ कोटींची स्टॅम्प ड्युटीही भरली आहे.  ४२ व्या मजल्यावर हे घर असल्याचं समजत आहे. 

अजय देवगन घेतली आलिशान कार, फक्त दोन भारतीयांकडेच आहे ती कार

शाहिदची जुहू परिसरातही दोन घरं आहेत. लवकरच शाहीद जुहूमधून वरळीच्या घरी राहायला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.