भारतातला सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग पाहता, हॉलिवूड चित्रपट हिंदीत डब होत आहेत. हल्ली हिंदी चित्रपटातले सुपरस्टार या हॉलिवूड चित्रपटासाठी डब करत आहेत. 'डेडपूल', 'जंगल बूक', 'कॅप्टन अमेरिका' यांसारखे चित्रपट हिंदीत डब होताना रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, ओम पुरी, नाना पाटेकर, वरुण धवन, टायगर श्रॉफ सारख्या अनेक कलाकारांनी आपला आवाज दिला. आता बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान प्रसिद्ध चित्रपट 'लायन किंग'च्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज देणार आहेत.
बिग बॉस मराठी २ : दिगंबर नाईक घराबाहेर, तर हिना पांचाळची वाईल्ड कार्ड एण्ट्री
१९९४ साली 'लायन किंग' अॅनिमेटड चित्रपट प्रदर्शित झाला. बच्चेकंपनीचा हा सर्वात आवडता चित्रपट ठरला. त्यानंतर 'सिम्बा' नावानं याच कथानकावर कार्टुन सीरिजही आली ती देखील बच्चेकंपनीची सर्वात लोकप्रिय कार्टुन सीरिज ठरली. आता तब्बल २५ वर्षांनंतर 'लायन किंग'चा थ्रीडी रिमेक येत आहे. जुलै महिन्यात हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी शाहरूख आणि त्याचा मुलगा आर्यन आवाज देणार आहेत.
शाहरूख मुफासा या कॅरेक्टरसाठी आवाज देणार आहे तर त्याचा मुलगा आर्यन सिम्बा या कॅरेक्टरसाठी हिंदीत डबिंग करणार आहे. 'माझा छोटा मुलगा अब्राहमला लायन किंग चित्रपट खूपच आवडतो. आता या चित्रपटाचा रिमेक येत आहे आणि त्यात वडील आणि आपल्या मोठ्या भावाचा आवाज ऐकायला मिळणार ही अब्राहमसाठी खूपच आनंदाची बाब असणार आहे, असं शाहरूख हिंदुस्थान टाइम्सशी साधलेल्या संवादात म्हणाला.