बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुखचा आज ५४ वा वाढदिवस. गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर मध्यरात्रीपासूनच गर्दी केली.
'ब्रह्मास्त्र'मध्ये आलिया- रणबीरसोबत शाहरूखही?
शाहरुखच्या वांद्र्यातील मन्नत या निवासस्थानी चाहत्यांची रात्री बारा वाजल्यापासूनच गर्दी जमली होती. मुंबईत अनेक ठिकाणी शुक्रवार दुपारपासूनच पावसाला सुरूवात झाली. मध्यरात्रीदेखील पावसाच्या सरी कोसळत होत्या. असं असलं तरी शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा उत्साह मात्र अजिबात कमी झाला नव्हता.
Mumbai: Shah Rukh Khan waves at fans who have gathered outside his residence, 'Mannat' on his 54th birthday. #Maharashtra pic.twitter.com/KtAj9mACRq
— ANI (@ANI) November 1, 2019
मध्यरात्री शाहरूखला शुभेच्छा देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून चाहते आले होते. दिल्ली, बिहार आणि इतर राज्यांतून आलेल्या शाहरुखच्या चाहत्यांची संख्या जास्त होती.
मी चहा नाही कॉफीच पिते, अनुष्कानं टीकाकारांना केलं क्लीन बोल्ड
घराबाहेर जमलेल्या चाहत्यांची शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी धडपड सुरू होती. शाहरूखनं बंगल्याबाहेर येऊन चाहत्यांचे आभार मानले.