पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : ऑस्ट्रेलियात शाहरुखभोवती चाहत्यांचा गराडा

शाहरुख खान

अभिनेता शाहरूख खान 'इंडिया फिल्म फेस्टिव्हल मेलबर्न'साठी  ऑस्ट्रेलियात आहे. हा चित्रपट महोत्सव ८ ऑगस्टपासून सुरू होत आहे, या महोत्सवाला उपस्थिती लावण्यासाठी शाहरूख ऑस्ट्रेलियात  पोहोचला. विमानतळावर शाहरूखचं आगमन होताच चाहत्यांचा गराडा त्याच्याभोवती पडला. गर्दीतून वाट काढत शाहरूख हॉटेलपर्यंत पोहोचला.

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी बाहुबली फेम अभिनेता मधू प्रकाशला अटक, हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप

शाहरूखला पाहण्यासाठी विमानतळावर ऑस्ट्रेलियन चाहत्यांची गर्दी जमली होती. शाहरूखसोबत एखादी सेल्फी  घेता यावी यासाठी चाहत्यांचे प्रयत्न सुरु होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#ShahRukhKhan reaches #australia and get mobbed for selfies #instadaily #manavmanglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

कलम ३७० : चित्रपटाच्या शिर्षक नोंदणीसाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ

८ ते १४ ऑगस्ट दरम्यान सुरू असणाऱ्या या  चित्रपट महोत्सवासाठी शाहरूख हा प्रमुख अथिती म्हणून उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे या महोत्सवात शाहरुख, काजोल, राणी मुखर्जीचा सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है' देखील दाखवण्यात येणार आहे. या सोहळ्यात ऑस्ट्रेलिया विद्यापीठाकडून शाहरूखचा सन्मानही करण्यात येणार आहे. शाहरूखच्या 'मिर' या स्वयंसेवी संस्थेद्वारे सुरू असलेलं  सामाजिक कार्य आणि भारतीय चित्रपटसृष्टीत त्यानं दिलेल्या योगदानाबद्दल त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Shah Rukh Khan was mobbed late Wednesday as he arrived in Australia for Indian Film Festival of Melbourne