पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहरुखच्या आवाजातील 'दी लायन किंग'चा ट्रेलर प्रदर्शित

दी लायन किंग

भारतातला सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग पाहता, हॉलिवूड चित्रपट हिंदीत डब होत आहेत. हल्ली हिंदी चित्रपटातले सुपरस्टार या हॉलिवूड चित्रपटासाठी डब करत आहेत. बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान प्रसिद्ध चित्रपट 'दी लायन किंग'च्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला आहे. शाहरुखच्या आवाजातील  'दी लायन किंग'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

१९९४ साली 'दी लायन किंग' अॅनिमेटड चित्रपट प्रदर्शित झाला. बच्चेकंपनीचा हा सर्वात आवडता चित्रपट ठरला. त्यानंतर 'सिम्बा' नावानं याच कथानकावर कार्टुन सीरिजही आली ती देखील बच्चेकंपनीची सर्वात लोकप्रिय कार्टुन सीरिज ठरली. आता तब्बल २५ वर्षांनंतर 'दी लायन किंग'चा थ्रीडी रिमेक येत आहे. जुलै महिन्यात हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी शाहरूख आणि त्याचा  मुलगा आर्यन आवाज दिला आहे.  शाहरूखनं मुफासा या कॅरेक्टरसाठी आवाज दिला आहे तर त्याचा मुलगा आर्यननं सिम्बासाठी आवाज दिला आहे. 
'माझा छोटा मुलगा अब्राहमला लायन किंग चित्रपट खूपच आवडतो. आता या चित्रपटाचा रिमेक येत आहे आणि त्यात वडील आणि आपल्या मोठ्या भावाचा आवाज ऐकायला मिळणार ही अब्राहमसाठी खूपच आनंदाची बाब असणार आहे, असं शाहरूख हिंदुस्थान टाइम्सशी साधलेल्या संवादात म्हणाला. 

या चित्रपटातील टिमॉन या कार्टुन कॅरेक्टरसाठी मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आवाज देणार आहे. टिमॉन  हा 'सिम्बा'चा जवळचा मित्र दाखवण्यात आला आहे. '१२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ओम शांती ओम चित्रपटात मी शाहरूखचा मित्र होतो. आता मी दी लायन किंगमध्ये शाहरूखच्या मुलाचा  मित्र असणार आहे' असं ट्विट करत श्रेयसनं आनंद व्यक्त केला होता. 

या व्यतिरिक्त आशिष विद्यार्थी 'स्कार', संजय मिश्रा 'फुम्बा', असरानी 'झाझु' या कार्टुन कॅरेक्टरसाठी आवाज देणार आहेत. १९ जुलैला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. भारतात हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू या भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.