पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ब्रह्मास्त्र'मध्ये आलिया- रणबीरसोबत शाहरूखही?

शाहरुख  खान

आयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात आलिया- रणबीरसोबत शाहरूखही दिसणार  आहे अशी चर्चा आहे. याबद्दल अधिकृत घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही, मात्र शाहरूख त्याच्या वाढदिवशी याबद्दल अधिकृत घोषणा करेल असं म्हटलं जात आहे. 

'बळी' या मराठी भयपटात दिसणार स्वप्नील जोशी

शाहरूखचा 'झिरो' चित्रपट रुपेरी पडद्यावर जोरात आदळला होता. त्यानंतर मनोरंजन विश्वातून शाहरूखनं काही काळ विश्रांती घेण्याचं ठरवलं होतं. या वर्षांत तो चित्रपटात दिसला नाही. मात्र  आयान मुखर्जीच्या बहुचर्चित चित्रपटात शाहरुख लहान भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

शाहरूखला चित्रपटाची कथा आवडली असून त्यानं चटकन चित्रपटासाठी होकार दिला आहे इतकंच नाही तर शाहरूखनं चित्रीकरणासाठी काही तारखाही राखून ठेवल्या असल्याचं म्हटलं जात आहे.  

मी चहा नाही कॉफीच पिते, अनुष्कानं टीकाकारांना केलं क्लीन बोल्ड

'ब्रह्मास्त्र' चित्रपट हा ख्रिस्मसमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली. आता हा चित्रपट उन्हाळ्यात २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.