पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहरुखमुळे ऐश्वर्या रायची मॅनेजर आगीपासून थोडक्यात बचावली

ऐश्वर्या रायची मॅनेजर अर्चना या आगीपासून थोडक्यात बचावल्या.

रिल लाईफ हिरो असलेला शाहरूख हा प्रत्यक्षातही हिरो ठरला आहे. शाहरूखच्या मदतीमुळे ऐश्वर्या रायची मॅनेजर अर्चना या आगीपासून थोडक्यात बचावल्या. अर्चना यांच्या लेहंग्याला आग  लागली, शाहरूखनं ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. शाहरूखच्या मदतीमुळे अर्चना थोडक्यात बचावली. 

दिवाळी पार्टीत आलेल्या कतरिना- विकीची सर्वाधिक चर्चा

सध्या अर्चना नानवटी रुग्णालयात असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांचा हात आणि पाय १५% भाजला आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शाहरुखलाही ईजा झाली आहे. 

अमिताभ बच्चन यांनी रविवारी संपूर्ण बॉलिवूडसाठी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. दोन वर्षांनी बच्चन यांनी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी बॉलिवूडमधले मोठे कलाकार उपस्थित होते. रात्री तीनच्या दरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती मिड डे दैनिकानं दिली. 

'गेम ऑफ थ्रोन्स'च्या प्रीक्वलची अधिकृत घोषणा

पार्टी संपल्यामुळे फार पाहुणे उपस्थित नव्हते, अर्चना या आपल्या मुलीसोबत होत्या. त्यावेळी त्यांच्या लेहंग्याला आग लागली. सारं काही अचानक घडल्यानं सगळेच स्तब्ध झाले, अशावेळी शाहरुखनं प्रसंगावधानता दाखवत  आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवताना शाहरूखलाही थोडी इजा झाली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.