पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर- आलियासोबत दिसणार शाहरूखही?

शाहरुख खान

गेल्या दोन वर्षांपासून रणबीर- आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.  शाहरूख या चित्रपटात वैज्ञानिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

कार्तिक, शाहिदला मागे टाकत विकी ठरला 'नंबर वन' लोकप्रिय अभिनेता

पिंक व्हिलानं दिलेल्या माहितीनुसार शाहरूख या चित्रपटात दिसणार आहे. 'झिरो' चित्रपटाच्या अपयशनानंतर शाहरूखनं चित्रपटातून जवळपास दोन वर्षांचा ब्रेक घेतला आहे. त्याचा 'झिरो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला. त्यानंतर शाहरूखनं कोणत्याही चित्रपटाला होकार दिला नाही. मात्र तो वैज्ञानिकाच्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

महापुरुषांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, निलेश साबळेची माफी

या चित्रपटात रणबीर आलियाबरोबर अमिताभ बच्चन, नार्गाजून, डिंपल कपाडिया यांसारखे कलाकारही दिसणार आहे. शाहरूखनं या चित्रपटासाठी दहा दिवसांचं चित्रीकरणही पार पाडलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार शाहरुखपासूनच चित्रपटाची सुरुवात होणार आहे. २०१८ पासून 'ब्रह्मास्त्र'चं चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात व्हीएफएक्स असल्यानं चित्रपट प्रदर्शनासाठी दिरंगाई होत आहे. डिसेंबर २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.