अनेक स्टारकिड्स आपल्या कलाकार आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. मात्र मुलगा आर्यन कदाचित अभिनय क्षेत्रापासून लांब राहिल असं शाहरुख खानला वाटत आहे.
शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन खान बॉलिवूड चित्रपटात पदार्पण करणार अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगत आहे. मात्र आर्यनला अभिनयात रस नाही, किंबहुना आर्यनला अभिनय जमणार नाही, असं शाहरुखनं एका मुलाखतीत म्हटलं आहे.
अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांसोबत शाहरूखची दिवाळी
अभिनेत्याचा मुलगा अभिनेता होतो असं चित्र भारतात पाहायला मिळतं. पण माझ्या मुलाला अभिनयात रस नाही, त्याला अभिनय जमेल असंही मला वाटत नाही. तो छान दिसतो, त्याचं व्यक्तीमत्त्वही चांगलं आहे. मात्र त्याला जाणीव झाली आहे. तो अभिनेत्यापेक्षा उत्तम लेखक होऊ शकतो. त्यानं प्रामाणिकपणे हे कबुल केलं. अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतर साहजिकच त्याची तुलना माझ्या कामाशी केली जाईल असं आर्यनला वाटतं. या वाटण्यात काहीच गैर नसल्याचं शाहरुखनं म्हटलं आहे.
राणादाचा कुस्तीला तात्पुरता रामराम, झाला पोलिसांत भरती
काही दिवसांपूर्वी आर्यन आणि शाहरुखनं 'दी लायन किंग' या चित्रपटाला आवाज दिला होता. लायन किंगमधल्या 'सिम्बा' या कार्टुन कॅरेक्टरसाठी आर्यननं आवाज दिला होता.