पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दोन आठवड्यानंतर शबाना आझमी घरी परतल्या

शबाना आझमी

ज्येष्ठ अभिनेत्री  शबाना आझमी या उपचारानंतर पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. शनिवारी १८ जानेवारीला शबाना आझमी यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर  भीषण अपघात झाला होता. या अपघातात आझमी जखमी झाल्या होत्या.  अपघातानंतर त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आलं होतं.  त्यांच्यावर मागील दोन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. 

..म्हणून 'रामायणा'नंतर १४ वर्षांत मनोरंजन विश्वातून लांब राहिले 'राम'

रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी चाहत्यांचे आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे  आभार मानले आहेत. चाहत्यांच्या प्रार्थनांमुळे मी बरी झाले असं म्हणत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांनी स्वत:चा फोटोही शेअर केला. 

गेल्या महिन्यात खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता, टोलनाक्याजवळ झालेल्या अपघातात आझमी आणि त्यांचा चालक कामथ जखमी झाला होता. सुदैवानं गाडीत असणारे जावेद अख्तर थोडक्यात बचावले होते. 

कोरोना विषाणू : मुंबई विमानतळावर मास्क घालून आला हा अभिनेता

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shabana Azmi who was injured during a road accident last month has been discharged from the hospital