पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शबाना आझमींच्या प्रकृतीत सुधारणा, लवकरच देणार डिस्चार्ज

शबाना आझमींच्या प्रकृतीत सुधारणा

ज्येष्ठ अभिनेत्री  शबाना आझमी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सुदैवानं काळजी करण्यासारखी गंभीर दुखापत नाही  त्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल असं त्यांचे पती जावेद अख्तर यांनी सांगितले. 

तान्हाजी करमुक्त, राज्य सरकारचा निर्णय

शनिवारी १८ जानेवारीला शबाना आझमी यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर  भीषण अपघात झाला होता. या अपघातात आझमी जखमी झाल्या होत्या.  अपघातानंतर त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आलं होतं. ही आनंदवार्ता आहे. सर्व वैद्यकिय चाचण्या पार पाडल्या आहेत. सुदैवानं कोणत्याही गंभीर दुखापती नाहीत. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत असं जावेद अख्तर बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

अक्षय कुमारनं मागितलं १२० कोटींचं मानधन?

खालापूर टोलनाक्याजवळ झालेल्या अपघातात आझमी आणि त्यांचा चालक कामथ जखमी झाला होता. सुदैवानं गाडीत असणारे जावेद अख्तर थोडक्यात बचावले होते. आझमी यांची अपघातानंतर बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी भेट घेतली तसेच त्यांची प्रकृती उत्तम असल्याचीही माहिती दिली.