पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कंगनासह 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींना मोदींच्या शपथविधीचे आमंत्रण

बॉलिवूड सेलिब्रिटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात  दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.  या सोहळ्यासाठी जवळपास ८ हजार लोक उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मसाठी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला सर्व राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय राजकारण्याव्यतिरिक्त बिमस्टेक आंतरराष्ट्रीय संघटनेचे नेते  आणि बॉलिवूड कलाकरही उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये कंगना रणौत, करण जोहर, शाहीद कपूर, बमन  इराणी, शाहरूख खान, विवेक ओबेरॉय यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इतर बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं अद्यापही समोर आलेली नाही. या शपथविधी सोहळ्यासाठी कंगना गुरूवारी पहाटेच दिल्लीला रवाना झाली आहे. ती बॉलिवूडमधली मोदी समर्थक  मानली जाते.  अनेकदा कंगनानं मुलाखती  मोदींचं भरभरून कौतुक देखील केलं आहे. 
याव्यतिरिक्त निर्माता, दिग्दर्शक करण जोहरही या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. करणनं यापूर्वी चित्रपटसृष्टीतील समस्या आणि विकास या विषयांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्याप्रमाणे शाहिद कपूर, सिद्धार्थ रॉय कपूरही सोहळ्यास उपस्थित  राहण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याचं समजतं आहे.  याव्यतिरिक्त दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, कमल हासन हे कलाकार मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

शपथविधीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावतीने विशेष पाहुण्यांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात परदेशी नेत्यांसह पंतप्रधान आणि नवीन कॅबीनेट मंत्र्यांचा समावेश असेन. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Several Bollywood celebrities attend Narendra Modi oath taking ceremony in Delhi on Thursday