पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील सोहम आहे 'या' ज्येष्ठ संगीतकारांचा मुलगा

आशुतोष पत्की

झी मराठी या वृत्तवाहिनीवर सुरु झालेली 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या मालिकेतील अनेक चेहरे प्रेक्षकांना परिचित आहेत. मालिकेतील ‘सोहम’ सगळ्यांचा लाडका बनला आहे. या मालिकेमुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्यामुळे तो कोण आहे याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळ्यांना उत्सुक्ता लागली आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hey guyss.... Today on the occassion of guru pournima I would like to share with you a very special news. Have signed a new project where me and my Dad will be working together ... What else could I have asked for!!! Its like a dream come true, getting to work with my life manual ❤DAD❤ Thanks Dad for sharing your DNA .... Now we're both fabulous 😁 You're the core of all my inspiration 😊😊😊 And a biggg Thank youu to all you guys for all the love and support... Will keep u updated on the new project... Watch this space for more details 😊😊😊 #blessed #oncloud9 #fathersonduo #mymentor #love #p2ap

A post shared by 𝐀𝐬𝐡𝐮𝐭𝐨𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐤𝐢 (@ashutoshpatki) on

'दी लायन किंग'ची आठवड्याभरात बक्कळ कमाई

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष हा 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेमध्ये सोहमची भूमिका साकारत आहे. आशुतोषने बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अभिनयाची सर्वात जास्त आवड असल्यामुळे तो या क्षेत्राकडे वळाला. त्याने अनुपम खेर यांच्या अ‍ॅकॅडमीमध्ये अभिनय शिकला. आशुतोषने या आधी अनेक मालिकांमध्ये काम केले. येत्या काही दिवसांमध्ये तो आपल्या पहिल्या 'वन्स मोअर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोहमने या आधी 'मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Kasa vatla episode??? #agabaisasubai #zeemarathi

A post shared by 𝐀𝐬𝐡𝐮𝐭𝐨𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐤𝐢 (@ashutoshpatki) on

जाणून घ्या 'कबीर सिंह' आणि 'सुपर ३०'ची आतापर्यंतची कमाई

‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका २२ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. झी मराठीवरील इतर मालिकांप्रमाणेच ही मालिका सुध्दा प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेमध्ये गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. यात तेजश्री प्रधानने 'शुभ्रा' ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर आशुतोष पत्कीने 'सोहम' ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या मालिकेतील आशुतोषच्या अभिनयामुळे तो सध्या प्रेक्षकांचा आवडता झाला असून अल्पावधितचं त्याचा फॅन फॉलोअर्स देखील वाढला आहे. 

समीरा रेड्डीचा बालपणीचा फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्