पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे

शोले चित्रपटातील 'कालिया' ही छोटीशी भूमिका अजरामर केलेले ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयातून त्यांना दोनच दिवसांपूर्वी घरी आणले होते. गावदेवी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

शोले, अंदाज अपना अपना यासह सुमारे ३०० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. विशेषतः त्यांच्या विनोदी भूमिका गाजल्या होत्या. शोले चित्रपटातील त्यांची कालियाची भूमिका विशेष गाजली होती. त्यातील 'सरदार मैने आपका नमक खाया है' हा संवाद तसेच अंदाज अपना अपना मधील 'गलती से मिस्टेक' हा संवाद अजूनही लोकप्रिय आहे. 

BLOG : शतकातील महानायक- अमिताभ बच्चन

अशी ही बनवाबनवी या सुपरहिट मराठी चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिकाही अतिशय उत्तमपणे वठवली होती. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांचे अभिनय कौशल्य आणि संवादफेक अप्रतिम असल्याने त्या दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या.