पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एकाच भूमिकेसाठी दुसऱ्यांदा 'जोकर'ला ऑस्कर

जोकर

'जोकर' चित्रपटातील लक्षवेधी अभिनयासाठी जोकीन फिनिक्सला यंदाचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ९२ वर्षांच्या ऑस्करच्या इतिहासात दुसऱ्यांदाच एकाच भूमिकेसाठी अभिनेत्याला ऑस्कर मिळत आहे. यापूर्वी दिवंगत अभिनेता हीथ लेजर यानं  'जोकर' हा खलनायक साकारला होता. त्याला जोकर या पात्रासाठी सर्वोत्तम अभिनयाचा ऑस्कर मिळाला होता. त्यामुळे जोकरची भूमिका साकारलेला आणि ऑस्कर पटकावलेला  जोकीन फिनिक्स हा दुसरा अभिनेता ठरला आहे.  

जोकीननं साकारलेला 'जोकर' हा जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटानं  कमाईचे अनेक विक्रम मोडले. ऑस्करमध्ये एकूण ११ नामांकनं 'जोकर'ला मिळाली. यापूर्वी जोकीन यानं सर्वोत्तम अभिनेत्याचा गोल्डन ग्लोबल, स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड आपल्या नावे केला आहे. 

ऑस्करमध्ये पहिल्यांदाच 'पॅरासाइट'नं रचला इतिहास

 'जोकर' ही आर्थर फ्लेक या व्यक्तीची कथा आहे. जोकर म्हणून काम करणाऱ्या आर्थरला  कॉमेडियन म्हणजेच विनोदवीर म्हणून करिअर घडवायचं होतं. मात्र  सतत त्याच्या वाट्याला अवहेलना, अपमान आणि तिरस्कारापलीकडे काहीच आलं नाही. लोकांनी आपल्यावर प्रेम करावं इतरांप्रमाणे आपल्यालाही समान समजावं अशी किमान अपेक्षा करणाऱ्या आर्थरच्या मनात हळूहळू समाजाविषयी द्वेष निर्माण होतो. त्याच्या मनात कटुता कठोकाठ भरते. समाजातील श्रीमंत आणि दुसऱ्याला कमी लेखणाऱ्या व्यक्तींविषयी त्यांच्या मनात निर्माण होणारी घृणा परिसीमा गाठते. इतकी की तो कित्येकाचे अत्यंत थंड डोक्यानं खूनही करतो त्यात त्याची वृद्ध आईदेखील असते. 

ब्रॅड पिटनं अभिनयासाठी पहिल्यांदाच जिंकला ऑस्कर

हसवणाऱ्या या विदूषकाचं राक्षसात रुपांतर का  होतं याची दूसरी बाजू  या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे 'जोकर' हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खलनायकापैकी एक आहे.