पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गेम ऑफ थ्रोन्स'चा प्रीक्वल येणार, अनेक गुपिते उलगडणार

'गेम ऑफ थ्रोन्स'चा प्रीक्वल येणार

एचबीओवरची तुफान लोकप्रिय ठरलेली आणि दीर्घकाळ चाललेली 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिका मे महिन्यात संपली. या मालिकेचे एकूण ८ सीझन प्रदर्शित झाले. २०११ मध्ये सुरू झालेल्या मालिकेनं मे २०१९ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेचा प्रीक्वल काढण्याचा विचार आता निर्माते करत आहेत. 

‘राम सिया के लव-कुश’ मालिकेत तथ्याशी छेडछाड केल्याप्रकरणी कलर्स वाहिनीला नोटीस

या मालिकेचा प्रीक्वल जॉर्ज आर. आर.  मार्टिन यांच्या 'फायर अँड ब्लड' या कांदबरीवर आधारित असेन. प्रीक्वलची कथा  ही साधरण तारगारयेन घराण्यास केंद्रस्थानी ठेवून लिहिली जाईन. 'गेम ऑफ थ्रोन्स' च्या ताकदवान आणि लढवय्या घराण्यांपैकी तारगारयेन घराणं एक असतं. आग ओकणारे ड्रॅगन्स या कुटुंबाकडे असतात. 'गेम ऑफ थ्रोन्स' या लोकप्रिय काल्पनिक मालिकेतील या कुटुंबाचा उदय आणि अस्त प्रीक्वलमध्ये दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे.  

Video : नऊ कलाकार, सहा लोककलाप्रकारांचा 'शिवराज्याभिषेक गीता'त सुरेल संगम

त्याप्रमाणे वेस्टरोसच्या इतिहासातील भयानक गुपिते, व्हाइट वॉकर्सचा  उदय, पूर्वेला असलेल्या स्टार्क घराण्याचा  इतिहास असे आधीच्या सिझनमध्ये न उलगडलेले असंख्य पैलू या प्रीक्वलमध्ये पाहायला मिळतील. तूर्त एचबीओनं याची औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच प्रीक्वलसाठी कथा लिहिण्याच्या कामास सुरूवात होईल अशी चर्चा आहे.