पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सायली- सुव्रतनं सांगितला एकत्र काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव

मन फकीरा

लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचे दिग्दर्शन असलेला  ‘मन फकीरा’ हा मराठी चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून नावारूपाला आलेला अभिनेता सुव्रत जोशी आणि ‘काहे दिया परदेस’ मालिकेमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ चित्रपटामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव हा अविस्मरणीय होता अशा  शब्दात दोघांनी आपल्या अनुभव व्यक्त केला आहे. 

PHOTOS : अभिनेत्री मितालीचं बोल्ड फोटोशूट

‘आम्ही ‘मन फकीरा’ सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. आम्हांला भूषण आणि रिया ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली. एकमेकांबरोबर काम करण्याचा अविस्मरणीय असा अनुभव होता. आमची या चित्रपटासाठी निवड केली याबद्दल दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे हिचे आम्ही खूप खूप आभार मानतो. तिने या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन खूप उत्तमरीत्या केले आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांना देखील आवडेल असा आम्हांला विश्वास आहे.’ असं सुव्रत आणि सायली म्हणाले. 

PHOTOS : मलायकाच्या स्टाइलनं चाहते घायाळ

सुव्रत जोशीने यापूर्वी शिकारी, पार्टी आणि डोक्याला शॉट या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे, त्याचबरोबर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका त्याची विशेष गाजली होती. ‘अमर फोटो स्टूडीओ’च्या माध्यमातून हा गुणवान कलाकार नाट्यरसिकांचे मनोरंजन करीत आहे. अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून काम करणारी अभिनेत्री सायली संजीव हिची झी मराठी वरील ‘काहे दिया परदेस’ ही तिची मालिका विशेष गाजली. ‘काहे दिया परदेस’ मालिकेत काम करण्यासोबतच तिने ‘पोलिस लाइन’, ‘आटपाडी नाईट्स’ तसेच ‘सातारचा सलमान’ या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. ‘मन फकीरा’ हा चित्रपट ६ मार्च रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.   

वडील विलासराव देशमुखांवर बायोपिक? रितेश म्हणतो..