पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#SareeTwitter ट्रेंडमध्ये, सेलिब्रिटींनी शेअर केले साडीतील फोटो

साडी ट्विटवर

ट्विटरवर सध्या '#SareeTwitter' हा  हॅशटॅग ट्रेंड होत आहे. हा हॅशटॅग वापरून अनेक सेलिब्रिटी आपला साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. खुद्द काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील ट्विटरवर त्यांचा २२ वर्षे  जुना साडीमधील फोटो पोस्ट केला आहे. अभिनेत्री सोनम कपूर हिनं देखील तिचा बालपणीचा साडीमधील फोटो शेअर केला आहे. 

ट्विटरवर #SareeTwitter हा हॅशटॅग वापरून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आपला साडीतील फोटो शेअर करत आहेत. शबाना आझमी, यामी गौतम, गुल पनाग सारख्या अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करत साडीमधला फोटो शेअर केला आहे. 

अभिनेत्री #SareeTwitter  हा हॅशटॅग वापरून फोटो शेअर करत आहेत मग अभिनेते तरी कसे मागे राहतील. प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना यानंदेखील त्याचा साडी नेसलेला फोटो शेअर करत सर्वांच लक्ष वेधलं आहे. 

हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. साडीत कोणतीही महिला  सुंदर दिसते असं कौतुक  सेलिब्रिटींनी केलं आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Saree Twitter hashtag is trending on twitter actors politician share their picture in saree