पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...अन खऱ्या पोलिसांनी खोट्या पोलिसांना केला सलाम: सारंग साठे

पांडू वेबसिरीज

एमएक्स प्लेअरवर मराठी ओरिजनल्स 'पांडू' ही नवीन आणि अनोखी वेबसिरीज सुरु झाली आहे. ही वेब सिरीज मुंबई पोलिसांच्या दैनंदिन आयुष्यावर आधारित आहे. या वेबसिरीजमध्ये सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या वेबसिरीजमध्ये पोलिसांच्या रोजच्या जीवनाचे चित्रण अतिशय रंजक आणि विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

कॉमेडियन वेणू माधव यांचे ३९ व्या वर्षी निधन

वेबसिरीजच्या प्रमोशन वेळी दिग्दर्शक सारंग साठे यांनी शूटिंगच्या वेळी घडलेला गंमतीदार किस्सा सांगितला आहे. "'पांडू' ही वेबसिरीज पोलिसांवर आधारित असल्याने आमचं बरंचसं शूटिंग हे पोलीस व्हॅनमध्येच व्हायचे. ज्याठिकाणी आम्हाला शूटिंगसाठी परवानगी होती नकळतपणे आम्ही त्या परिसराच्या बाहेर गेलो. एका सिग्नलवर आम्हाला खऱ्या पोलिसांनी अडवले. ते खरे पोलिस आम्हाला सलाम करत होते.' हा किस्सा आठवला की आम्ही पोट धरुन हसतो. मात्र त्यावेळी आमची घाबरगुंडी उडाली होती', असे त्यांनी सांगितले.  

'हाऊसफुल ४'चे पोस्टर रिलीज; असा आहे अक्षय, रितेश आणि बॉबीचा फर्स्ट लूक

दरम्यान, 'पांडू' ही वेबसिरीज सर्वांना एमएक्स प्लेयरवर विनामूल्य बघता येणार आहे. 'पांडू' वेबसिरीजचे दिग्दर्शन सारंग साठे आणि अनुषा नंदा कुमार यांनी केले आहे. पोलिसांच्या न पाहिलेल्या जीवनाचे चित्रण या वेबसिरीजच्या माध्यमातून आपल्याला घडणार आहे.

Bigg boss: ४०० कोटी नाही तर 'ऐवढे' मानधन घेणार सलमान