'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री सारा अली खान ही अक्षय कुमारसोबत 'अतरंगी रे' या चित्रपटात दिसणार आहे. मुंबई मिररनं दिलेल्या माहितीनुसार सारा या चित्रपटात डबल रोल म्हणजेच दुहेरी भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीचा पॉर्न स्टार होण्याचा धक्कादायक निर्णय
प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात साराबरोबर अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य कलाकार धनुष्यचीही प्रमुख भूमिका आहेत. १ मार्चपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाची कथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते हिमांशू शर्मा यानं लिहिली आहे.' 'अतरंगी रे' च्या निमित्तानं सारा- अक्षय- धनुष्य हे त्रिकुट एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यातून सारा अली खानची दुहेरी भूमिका असल्यानं हा नक्कीच वेगळा चित्रपट ठरणार आहे.
कमल हासन यांच्या 'इंडियन २'च्या सेटवर अपघात, ३ मृत्युमुखी
गेल्याच आठवड्यात सारा अली खानचा 'लव्ह आज कल' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकण्यास साराला पुन्हा मेहनत करावी लागणार आहे.