पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साराची स्वस्तात मस्त फॅशन!

सारा अली खान

सेलिब्रिटी हे नेहमीच त्यांच्या आलिशान लाईफस्टाइलसाठी चर्चेत असतात.  ब्रँडेड आणि डिझायनर कपडे, महागडे दागिने, महागड्या बॅग्स, चप्पल यांची हौस सेलिब्रिटींना असते. अनेकदा त्यांच्या कपड्यांच्या किंमती काही लाखोंच्या घरात असतात. अशी  आलिशान लाईफस्टाइल जगणाऱ्या कित्येक अभिनेत्री आहेत यात करिना कपूर खान, दीपिका पादुकोन, प्रियांका चोप्रा ते जान्हवी कपूरचंही नाव घेता येईल. मात्र सैफची मुलगी सारा या सर्वांहूनही पुन्हा एकदा वेगळी ठरली आहे. आपल्या आलिशान लाइफस्टाइलपेक्षाही स्वस्तात मस्त लाइफस्टाइलमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

मुंबईत एका  कार्यक्रमादरम्यान सारा मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसची किंमत ही केवळ  २,५०० हजारांच्या घरात होती. स्टार किड असूनही साराची ही स्वस्तात मस्त लाइफस्टाइल अनेकांना आवडली.  यापूर्वी सारा आपल्या आईसोबत स्ट्रीट शॉपिंगही करताना दिसली होती. या दोघांचे रस्त्यावर खरेदी करतानाचे फोटो व्हायरल  झाले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Pretty and vivacious #saraalikhan today in @myglobaldesi

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सारानं 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं  होतं. साराच्या अभिनयाचं सगळ्यांनी कौतुक केलं. मात्र साराचा स्वभाव सर्वांना अधिक आवडला. स्टारकिड असूनही  अत्यंत साधं, सहज वागणं, तिचा हसरा  मनमिळावू स्वभाव  अनेकांना  भावला . 'केदारनाथ'च्या यशानंतर सारानं रणवीर सिंग सोबत 'सिम्बा' चित्रपटातही  काम  केलं. आता ती 'कुली नंबर १' च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे.