पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फॅट टु फिट, साराचा पूर्वीचा फोटो पाहून तुम्हालाही बसेन आश्चर्याचा धक्का

सारा अली खान

सारा अली खाननं २०१८ साली आलेल्या 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. साराचा साधा, तितकाच नम्र आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव सर्वांनाच आवडला  म्हणूनच सारा ही अल्पावधीतच लोकप्रिय झाली. 

रानू मंडलचं गाणं ऐकून लता मंगेशकर म्हणतात....

सारानं नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वजन घटवण्यापूर्वीचा फोटो  शेअऱ केला आहे. जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. साराला बॉलिवूडमध्ये करिअर घडवायचं होतं.  साराला तिची आई अभिनेत्री अमृता सिंहनं वजन घटवण्याचा सल्ला दिला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Throw🔙 to when I couldn’t be thrown🔙☠️🙌🏻🎃🐷🦍🍔🍕🍩🥤↩️ #beautyinblack

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

'बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी माझं वजन जवळपास ९६ किलो होतं. मला पीसीओडी असल्यामुळे वजन घटवणं अशक्य होतं मात्र मी स्वत:वर मेहनत घ्यायला सुरूवात केली. त्यावेळी ३० किलो वजन मी घटवलं होतं.' असं सारा म्हणाली. 

माझी विद्यार्थिंनी आज सुपरस्टार, शिक्षिकेचं दीपिकाला भावनिक पत्र

 सारा अल्पावधीतच  बॉलिवूडमधला लोकप्रिय चेहरा ठरली. लवकरच ती 'लव्ह आज कल'चा सीक्वल आणि 'कुली नंबर १' मध्ये दिसणार आहे.