पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सारा- कार्तिक पुन्हा दिसले एकत्र!

सारा- कार्तिक

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय याचं कुतूहल त्यांच्या चाहत्यांना आहे. ही जोडी इम्तिआज अलीच्या नव्या चित्रपटात दिसणार आहे.  काही दिवसांपूर्वी दिल्लीत चित्रपटाचं चित्रीकरण  सुरू होतं. आता मुंबईत चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. या चित्रीकरणादरम्यान सारा आणि कार्तिक चित्रीकरण संपवून एकाच कारमधून घरी जाताना दिसले. या फोटोवरून या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशा चर्चा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सुरु झाल्या आहेत. 

सोनू की टिटू की स्वीटी, लुकाछुपी चित्रपटानंतर कार्तिकच्या फॅन फॉलोईंगमध्ये मोठी वाढ झाली. विशेषत:  त्याच्या चाहत्यावर्गात तरूणींचा समावेश अधिक आहे. काही महिन्यांपूर्वी कॉफी विथ करण या कार्यक्रमात सारानं कार्तिकसोबत डेटवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तेव्हापासून कार्तिक आणि सारा  ही जोडी चर्चेत आहे.  मात्र ज्या मुलाजवळ  पैसे असतील, त्याची आर्थिक बाजू जमेची असेल त्याच मुलाला सारानं डेट कारावं अशी अट सैफनं ठेवली. यावर कार्तिकही तयार झाला होता. 

लव्ह आज कलच्या सीक्वलदरम्यान  सारा आणि  कार्तिकचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. किसिंग सिनचा हा  व्हिडिओ होता. मात्र या व्हिडिओत दिसणार जोडपं आम्ही नव्हचे  असं कार्तिकनं स्पष्ट केलं होतं.