पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून सोशल मीडियात ट्रोल झाली सारा अली खान

सारा अली खान

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान चित्रपटासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडींमुळे कायम चर्चेत असते. दरवेळी वेगवेगळ्या कारणांमुळे सारा अली खान सोशल मीडियामध्ये चर्चेत येते. यावेळीही एका फोटोमुळे सारा अली खान चर्चेत आली आणि ट्रोलही झाली. या फोटोचा विषय आहे गणपतीची पूजा करतानाचा.

आमीर खानने मागितली माफी, नेटिझन्सनी उडविली खिल्ली

सारा अली खानने गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या मूर्तीची पूजा करतानाचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. गणेशोत्सवानिमित्त हातात फुल घेऊन गणपतीच्या मूर्तीपुढे सारा उभी आहे आणि ती कॅमेऱ्याकडे बघते आहे, असा हा फोटो आहे. साराने लाल रंगाचा कुर्ता आणि क्रीम रंगाचे लेगिन घातले आहे. याच फोटोवरून काही जणांनी सारा अली खान हिला ट्रोल केले.

तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोप प्रकरणाला नवे वळण

काही जण साराच्या फोटोवर वेगवेगळ्या स्वरुपाच्या कमेंट्स टाकत आहेत. तर काही जण या फोटोतील साराच्या लूकचे तोंडभरून कौतुकही करीत आहेत. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये साराने गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती सर्वांच्या आयुष्यातील अडचणी दूर करू दे आणि येणारे वर्ष सर्वांना आनंदाचे, सकारात्मकतेचे आणि यशाचे जाऊ दे, अशी प्रार्थना तिने केली आहे.