सारा अली खान ही तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. स्टार किड असल्याचा कोणताही बडेजाव तिच्या स्वभावात नसतो. तिच्या हसऱ्या, मनमिळाऊ स्वभावानं तिनं अनेकांचं मन जिंकलं आहे. 'केदारनाथ' चित्रपटातून गेल्यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सारा ही तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. नुकतंच साराला मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं. स्वत:चं सामान कोणत्याही मदतीविना वाहून नेणाऱ्या साराला पाहून तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
कलम ३७० : चित्रपटाच्या शिर्षक नोंदणीसाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ
अनेकदा सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्याभोवती मदतनीस, सुरक्षारक्षकांचा गराडा असतो. त्यांचं सामान वाहून नेण्यासाठी मदतनीस असतात. मात्र सारानं कोणाचीही मदत घेतली नाही. ज्येष्ठ अभिनेत्री ऋषी कपूर यांनीदेखील साराचं कौतुक केलं आहे. एका सेलिब्रिटींनी कसं वागलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण तू आहेस, स्वत:चं सामान स्वत: वाहून नेण्यात कोणताही कमीपणा नसतो. एअरपोर्ट लूक, गडद सनग्लासेस सर्व तू बाजूला ठेवलं, तुझ्यात कोणतीही असुरक्षिततेची भावना नाही, याचं मला कौतुक वाटतं, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी सारा अली खानचं कौतुक केलं आहे.
Wonderful Sara. You set examples how celebrities should behave at the airport. No harm at all tugging your own baggage, no chamchas to receive and the icing on the cake! No dark glasses or an airport look. You show confidence with no insecurities. Atta girl! https://t.co/vj5MDBRW4v
— Rishi Kapoor (@chintskap) August 7, 2019
Video : ऑस्ट्रेलियात शाहरुखभोवती चाहत्यांचा गराडा
सारा अली खान सध्या 'लव्ह आज कल'च्या सीक्वलमध्ये व्यग्र आहे. कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लखनऊमध्ये सुरू होते. ते संपवून सारा मुंबईत परतली आहे.