अभिनेत्री सारा अली खान नुकतीच वाराणसीत होती. वाराणसीतील गंगेच्या तिरावर रम्य संध्याकाळ व्यतीत करतानाचा फोटो सारानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या कलाकाराला महाराष्ट्रात उभारायचा आहे बुर्ज खलिफा!
गंगा घाटावर जगभरातून लाखो लोक दरवर्षी दर्शनासाठी येतात. सारानंही गंगा घाटावर बसून गंगेचं शांत पण तितकंच लोभसवाणं आणि नयनरम्य दृश्य निहाळण्याचा आनंद घेतला. तिनं गंगेची आरतीही केली. सायंकाळी होणाऱ्या गंगेच्या आरतीसाठी साराही उपस्थिती होती. सारानं आपल्या धार्मिक यात्रेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उशीर होण्यासाठी दीपिका कारणीभूत, रणवीरच्या थापा
सारा अली खान नुकतीच 'लव्ह आज कल' चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला. चित्रपटाला म्हणावं तशी प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र आता सारा नव्यानं कामाला लागली आहे. तिचा वरुण धवनसोबत 'कुली नंबर २' चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याचसोबत ती अक्षय कुमार आणि धनुष्यसोबत 'अतरंगी रे' चित्रपटातही दिसणार आहे.