पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अतरंगी रे' मध्ये सारा अली खान दिसणार अक्षय कुमारसोबत

अतरंगी रे

'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री  सारा अली खान ही अक्षय कुमारसोबत 'अतरंगी रे' या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सारा आणि अक्षयसोबत धनुष्यचीही प्रमुख भूमिका आहे. प्रसिद्द दिग्दर्शक आनंद एल राय या चित्रपटचं दिग्दर्शन करत आहे. पहिल्यांदाच साराला सुपरस्टार अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळत आहे.  

टक्कर टाळण्यासाठी 'विकून टाक' च्या प्रदर्शनाची तारीख बदलली

विशेष म्हणजे केवळ १० मिनिटांत अक्षयनं या चित्रपटाला होकार भरला आहे. अनेक मोठ्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या आनंद राय यांच्यासोबत काम करण्यास अक्षय कमालीचा उत्सुक आहे. ''आनंद यांनी मला चित्रपटाची कथा ऐकवली. मला ती खूपच आवडली. माझी भूमिका नक्कीच आव्हानात्मक आहे. मात्र  या चित्रपटाला मी नकार देऊ शकलो नाही. केवळ दहा मिनिटांत मी माझा निर्णय आनंद यांना सांगून टाकला'',  असं अक्षय म्हणाला. 

रुग्णालयात दाखल असलेल्या दिग्दर्शकाच्या उपचारांचा खर्च अक्षयनं उचलला

या चित्रपटाविषयी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ए.आर. रेहमान या चित्रपटाला संगीत देणार आहेत. १ मार्चपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाची कथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते हिमांशू शर्मा  यानं लिहिली आहे.''  'अतरंगी रे' च्या निमित्तानं  सारा- अक्षय- धनुष्य हे त्रिकुट एकत्र पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना पडद्यावर नवं काहीतरी पहायला मिळेल'', असा विश्वास आनंद राय यांनी व्यक्त केला आहे.