पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ईदला प्रदर्शित होणार नाही सलमान- आलियाचा 'इंशाअल्लाह'

सलमान खान- आलिया भट्ट

संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित अशा 'इंशाअल्लाह' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. हा चित्रपट २०२० मध्ये ईदला प्रदर्शित होणार होता. मात्र अभिनेता  सलमान खाननं हा चित्रपट आता ईदला  प्रदर्शित होणार नाही अशी अधिकृत घोषणा केली आहे.  पण, ईदच्या दिवशी मी प्रेक्षकांच्या भेटीला नक्की येणार असंही सलमान म्हणाला आहे. सलमान खानचा चित्रपट आणि ईद हे समीकरण वर्षांनुवर्षे ठरलेलं आहे. पण यावेळी सलमानं त्याच्या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार, महादेव जानकरांचा दावा

'इंशाअल्लाह' च्या निमित्तानं सलमान आणि संजय लीला भन्साळी दोघंही बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात सलमानसोबत आलिया भट्टही प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी कमालीचं कुतूहलही आहे. आलिया आणि सलमान या दोघांच्या वयामध्ये खूप मोठं अंतर आहे. त्याचप्रमाणे हे दोघंही पहिल्यांदाच एका चित्रपटात काम करत आहेत त्यामुळे ही जोडी पडद्यावर कशी दिसेन हे पाहण्यास चाहतेही उत्सुक आहेत. 

प्रभास म्हणाला, रविना माझी एक्स गर्लफ्रेंण्ड

१५ ऑगस्टनंतर 'इंशाअल्लाह'चं चित्रीकरण सुरू होणं अपेक्षित होतं. चित्रपटातील  काही भाग हा मुंबईत चित्रीत करण्यात येणार आहे. त्यानंतर ऋषीकेश, वाराणसी, हरिद्वार आणि अमेरिकेत  चित्रीकरण होणार आहे.  मात्र अद्यापही या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झालेली नाही. हा चित्रपट ईदला प्रदर्शित होईन अशी घोषणा पूर्वीच झाली होती, मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.