पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेतील आलियाचा पहिला लूक प्रदर्शित

गंगूबाई काठियावाडी

अभिनेत्री आलिया भट्ट हिचा 'गंगूबाई काठीयावाडी' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट  'गंगूबाईं'ची भूमिका साकारत आहे. या भूमिकेतील आलियाचा पहिला लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मध्ये हा ज्येष्ठ अभिनेता वडिलांच्या भूमिकेत

कामाठीपुरामधल्या देहविक्रेय करणाऱ्या  महिलांसाठी 'गंगूबाई' हे नाव देवदूतापेक्षा कमी नाही. नववारी साडी आणि कपाळावर मोठी टिकली लावून वावरणाऱ्या गंगूबाई या  देहविक्रेय करणाऱ्या  महिलांच्या वस्तीत दंतकथा बनून  राहिल्या आहेत. त्या  'गंगूबाई कोठेवाली' किंवा 'गंगूबाई' या नावानं वस्तीतचं नाही तर अख्ख्या मुंबईत ओळखल्या जायच्या. त्यांची भूमिका आलिया भट्ट साकारत आहे. संजय लिला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० ला प्रदर्शित होत आहे. 

कोण आहेत गंगूबाई
पत्रकार हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई'  या कांदबरीत  गंगूबाई यांच्याविषयी लिहलं गेलं आहे. नवऱ्यानं फसवून त्यांना देहविक्रेय करणाऱ्या महिलेला विकलं होतं. सधन  कुटुंबातून आलेल्या गंगूबाईचं कमी वयात आयुष्य उद्धवस्त झालं.  गंगूबाईंच्या परतीचे दरवाजे बंद झाले. देहविक्रेय करायला नशीबानं भाग पाडलं असलं तरी  पुढे  याच गंगूबाई देहविक्रेय करणाऱ्या महिलांसाठी आशेच्या किरण ठरल्या होत्या. मनाविरुद्ध या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलींची सुटका करून त्यांना गंगूबाई घरी पाठवून दयायच्या.

सिनेसृष्टीत महिलांना मानाचा दर्जा प्राप्त करुन देणाऱ्या 'दुर्गा'

या अभिनेत्रींना होती गंगूबाईसाठी पसंती
अभिनेत्री राणी मुखर्जीनं गंगूबाईंची भूमिका साकारावी अशी भन्साळींची इच्छा होती. यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. मात्र काही गोष्टी जुळून आल्या नाहीत. राणीनंतर भन्साळी दुसऱ्या सक्षम अभिनेत्रीच्या शोधात होते. 'बाजीराव मस्तानी' चित्रपट करताना भन्साळींच्या डोक्यात प्रियांका चोप्राचं नाव आलं. मात्र प्रियांकाचं वेळापत्रक हे खूपच व्यग्र आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या ऑफर्स प्रियांकाच्या पदरी आहेत. प्रियांकाच्याही तारखा उपलब्ध नसल्यानं अखेर आलियाच्या नावाचा  विचार भन्साळींनी केला.