पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संजय लीला भन्साळी करणार पंतप्रधान मोदींवरील चित्रपटाची निर्मिती

संजय लीला भन्साळी करणार 'मन बैरागी'ची निर्मिती

काही महिन्यांपूर्वी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट प्रदर्शित झाला  होता. या चित्रपटाला काही  ठिकाणी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. आता बॉलिवूडमधले नावाजलेले दिग्दर्शक संजय लीला भन्साळी देखील मोदींवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 

KBC ११ : महिन्याला दीड हजार कमावणाऱ्या अमरावतीच्या बबिता कोट्यधीश

१७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या ६९ व्या वाढदिवशी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या हस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण होणार असल्याचं  समजत आहे. हा एक तासांचा विशेष चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं नाव 'मन बैरागी' असणार आहे. मोदींच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारा प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेतली आहे. यापूर्वी  ही गोष्ट कधीही ऐकली नसेन असं भन्साळी म्हणाले. 

आयुष्मानच्या 'ड्रिम गर्ल'ची बॉक्स ऑफिसवर चलती

या चित्रपटाची कथा संजय त्रिपाठी यांनी लिहिली आहे आणि दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. महावीर जैन या चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. 'मन बैरागी'मधली कथा ही नक्कीच तरुणांना प्रेरणादायी ठरेन असा आशावादही जैन यांनी व्यक्त केला आहे.