पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मलाल चित्रपटातून भन्साळींची भाची आणि जावेद जाफरीच्या मुलगा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

शर्मिन सेगल

निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सेगल आणि  जावेद जाफरीचा मुलगा मिझान हे दोघंही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या दोघांच्या पदार्पणाच्या चित्रपटाची  निर्मिती स्वत: संजय लीला भन्साळी करणार आहेत. 'मलाल' असं चित्रपटाचं नाव असणार आहे. १८ मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत आहे.

काही महिन्यांपूर्वी  शर्मिनच्या बॉलिवूड पदार्पणाची अधिकृत घोषणा भन्साळी फिल्मनं केली होती. शर्मिन ही संजय लीला भन्साळींच्या बहिणीची मुलगी आहे. तिनं  अभिनय क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. भन्साळींची निर्मिती असलेल्या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये  पदार्पण करेन असं  काही महिन्यांपूर्वी सांगण्यात आलं होतं. १८ मे २०१९ रोजी 'मलाल' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे यात  मिझान आणि शर्मिन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मंगेश हडवले या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. 

या दोघांच्या भूमिकेबद्देल फार माहिती समजू शकली नाही. मात्र मलालच्या निमित्तानं दोन नवे चेहेरे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहेत. तर दुसरीकडे संजय लीला भन्साळी हे त्यांच्या आगामी 'ईन्शाल्ला'  चित्रपटात व्यग्र आहेत. आलिया भट्ट आणि सलमान खान यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं आलिया आणि सलमान खान ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे.