पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून ईदला प्रदर्शित होणार नाही सलमान- आलियाचा 'इंशाअल्लाह'

इंशाअल्लाह

सलमान आणि आलियाच्या बहुचर्चित अशा 'इंशाअल्लाह' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'इंशाअल्लाह' चित्रपट २०२० मध्ये ईदला प्रदर्शित होणार होता. मात्र हा चित्रपट आता ईदला प्रदर्शित होणार नाही. सलमान खाननं यासंबधीची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे. 

'इंशाअल्लाह'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागचं कारण काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर अजूनही काम पूर्ण झालेलं नाही म्हणून प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची  माहिती  ईटाइम्सनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

प्रभास म्हणाला, रविना माझी एक्स गर्लफ्रेंण्ड

१५ ऑगस्टनंतर 'इंशाअल्लाह'च्या चित्रीकरणाला सुरूवात होणं अपेक्षित होतं. मात्र अद्यापही चित्रीकरण सुरू झालेलं नाही. संजय लीला भन्साळी यांनी सलमानला पूर्वार्धपर्यंतची कथा ऐकवली होती. मात्र उत्तरार्धतल्या कथेवर अजूनही काम झालेलं नाही. सलमानला उत्तरार्धाचीही कथा ऐकायची आहे. यावर काम सुरू असल्यानं चित्रपटाचं चित्रीकरण सुरू व्हायला उशीर लागत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस'ची बक्कळ कमाई

'इंशाअल्लाह' च्या निमित्तानं सलमान आणि संजय लीला भन्साळी दोघंही बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात सलमानसोबत आलिया भट्टही प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी कमालीचं कुतूहलही आहे. आलिया आणि सलमान या दोघांच्या वयामध्ये खूप मोठं अंतर आहे. त्याचप्रमाणे हे दोघंही पहिल्यांदाच एका चित्रपटात काम करत आहेत त्यामुळे ही जोडी पडद्यावर कशी दिसेन हे पाहण्यास चाहतेही उत्सुक आहेत.

..तर पाकिस्तानातही जाऊन परफॉर्म करेन- शिल्पा शिंदे

ईदला 'इंशाअल्लाह' प्रदर्शित होत नसला तरी या दिवशी प्रेक्षकांसाठी सलमान वेगळं सरप्राईजही आणणार आहे असंही म्हटलं जात आहे. आता हा चित्रपट डिसेंबर २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.