पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संजय दत्त सांगणार वैष्णोदेवीची कथा

संजय दत्त

अभिनेता संजय दत्त हा लवकरच निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 30 सप्टेंबरपासून ‘स्टार भारत’ वाहिनीवरून ‘जग जननी माँ वैष्णोदेवी- कहानी माता रानी की’ या नव्या मालिकेचे प्रसारण केले जाणार आहे.  

आयुष्मानच्या 'ड्रिम गर्ल'ची बॉक्स ऑफिसवर चलती

संजय दत्त या  मालिकेसाठी निवेदक म्हणून काम पाहणार आहे.  वैष्णोदेवीची कथा सांगण्याची संधी निवेदक म्हणून संजयला देण्यात आली आहे. या संधीबाबत संजयही खूप उत्सुक आहे. या मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदाच संजय टीव्ही क्षेत्रासाठी योगदान देत आहे. 

जोडीदाराची खिल्ली उडवणाऱ्या नेटकऱ्यांना नेहाचं सडेतोड उत्तर

चाहते आणि प्रेक्षाकांना ही कथा ऐकायला नक्कीच आवडेल असा विश्वास संजयनं व्यक्त केला आहे. या मालिकेची कथा वैष्णोदेवीच्या जन्माबद्दल आहे. संजय दत्तने आजवर 'वास्तव- द रिअ‍ॅलिटी', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई' यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून अलीकडच्या काळात 'अग्निपथ'सारख्या चित्रपटात खलनायकाचीही भूमिका रंगवून सर्वांना चकित केले होते. संजय दत्तचा 'प्रस्थानम्' हा चित्रपटही या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sanjay Dutt to make a fiction debut on Indian TV with Star Bharat new mytho show Jag Jaanani Maa Vaishno Devi