पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संजय दत्तचा ‘बाबा’ चित्रपट ‘गोल्डन ग्लोब्ज'मध्ये

बाबा

संजय दत्तची निर्मिती असलेला ‘बाबा’ चित्रपट हा 'गोल्डन ग्लोब'मध्ये दाखवला जाणार आहे. हा चित्रपट २ ऑगस्टरोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून वाहवा मिळाली आहे. चित्रपटातील प्रमुख कलाकार दीपिक डोबरीयाल यानं हा चित्रपट  'गोल्डन ग्लोब'मध्ये दाखवला जाणार आहे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

त्या कलाकारांवर एफआयआर दाखल करण्याची आमदाराची मागणी

हा चित्रपट 'गोल्डन ग्लोब'मध्ये दाखवला जाणार आहे ही नक्कीच चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी आनंदाची बाब आहे. हा चित्रपट परदेशी भाषा चित्रपट विभागासाठीही पाठवण्यात येणार असल्याचं दिपक यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं. 

भारतीय सैन्यांसाठी विकी घेतोय स्वयंपाकाचे धडे

या चित्रपटाचा एकूण कलावधी काही मिनिटांनी कमी करण्यास आम्हाला सांगण्यात आलं आहे. यासंबधी निर्मात्यांशी चर्चा करण्यात येईल अशीही माहिती दीपक यांनी दिली.  ‘बाबा’ची निर्मिती मान्यता दत्त यांच्या नेतृत्वाखालील ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’ आणि अशोक व आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’तर्फे झाली आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sanjay Dutt Marathi production Baba will be screened for the Hollywood Foreign Press Association