पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'केजीएफ २' मध्ये संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत

केजीएफ २

'केजीएफ चॅप्टर २' चित्रपट  डिसेंबर अखेरिस प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाला दाक्षिणात्यच नाही तर हिंदी प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद लाभल्यानंतर आता प्रेक्षक सीक्वलची वाट पाहत आहेत.  या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेता संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. 'केजीएफ २' मधील  खलनायकाचा पहिला लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला.  संजय अधिरा या खलनायकाच्या भूमिकेत आहे. 

दीपिका, रणबीरसह करणच्या पार्टीतील सर्व कलाकारांची उत्तेजकद्रव्य चाचणी करा, आमदाराची मागणी

'या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी पहिली पसंती ही संजय दत्तलाच होती. मात्र  काही कारणामुळे संजयसोबत काम करण्याचा योग जुळून आला नाही. केजीएफच्या पहिल्या भागासाठीच संजयला विचारण्यात आलं होतं, मात्र तो इतर चित्रीकरणात व्यग्र असल्यानं त्याला तारखा देता आल्या नाहीत, असं या चित्रपटातील प्रमुख कलाकार यश यानं सांगितलं. 

तवांगमध्ये भारतीय सैन्यांसोबत काही दिवस राहणार अभिनेता विकी कौशल

संजयसोबत काम करण्यास यशही खूप उत्सुक आहे.  यशनं त्याचा आनंदही व्यक्त केला आहे. डिसेंबर अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या महिन्यात चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.