पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी पाकिस्तानी संघाची आई नाही, विणावर भडकली सानिया मिर्झा

विणा सानिया ट्विटर वॉर

आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी पाकिस्तानी अभिनेत्री विणा मलिकवर टेनिसपटू सानिया मिर्झा  चांगलीच चिडली आहे. रविवारी विश्वचषक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानच्या पराभवास विणानं सानियाचा पती शोएबला जबाबदार धरलं त्याचप्रमाणे तिनं या वादात सानिया- शोएबच्या  चिमुकल्यालाही ओढलं. त्यामुळे सानियानं विणाला ट्विटरवरून चांगलंच  खडसावलं आहे. 

सानिया आणि शोएबचे  काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका रेस्तराँमध्ये ते जेवायला गेले होते. 'मला तुझ्या छोट्या मुलाची सर्वात काळजी वाटते. तुम्ही त्याला एका जंक फूड रेस्तराँमध्ये घेऊन गेलात. मला जेवढं माहिती आहे  त्यावरून जंक फूड हे लहान मुलं आणि खेळाडूंसाठी योग्य नाही. तू एक आई आहेस त्याचबरोबर तू एक खेळाडू आहेस. तुला याची माहिती असायलाच हवी' असं ट्विट विणानं केलं. 

यावर सानिया मिर्झा चांगलीच भडकली. 'मी माझ्या मुलाची आई  आहे त्यामुळे त्याच्याबद्दल अधिक मला माहिती आहे. तुला किंवा कोणालाही काळजी करण्याचं कारण नाही. मी माझ्या मुलाला कोणत्याही जंक फूड रेस्तराँमध्ये नेलं नव्हतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे  मी पाकिस्तानी संघाची डाएटिशियन नाही. मी त्यांची आई किंवा शिक्षकही नाही', असं तिनं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

'आम्ही कधी उठतो, झोपतो काय खातो याकडे तुमचं बरंच लक्ष असतं म्हणजे तुला आमची काळजी आहे', असा उपरोधिक शेराही विणाला सानियानं लगावला.