पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छोट्या पडद्यावरचा हा अभिनेता दिसणार ‘विक्की वेलिंगकर’ मध्ये

विक्की वेलिंगकर

‘विक्की वेलिंगकर’ या आगामी चित्रपटात अनेक मालिका आणि विविध नाटकांमधून अभिनय करणारा अभिनेता संग्राम समेळ एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. संग्राम समेळ पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी संग्रामने त्याचे सिनेमातील पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. 

अभिनेता संग्राम समेळ हा यापूर्वी 'उंडगा', 'ब्रेव्ह हार्ट', 'ललित २०५' यांसारख्या मालिकां तसेच 'एकच प्याला', 'कुसुम मनोहर लेले' सारख्या नाटकांत दिसला होता. या चित्रपटात संग्राम ‘विक्की वेलिंगकर’ म्हणजेच सोनालीच्या मित्राची भूमिका साकारत आहे. 

प्रियांका- निकनं तब्बल ११४ कोटींचं घर घेतल्याची चर्चा

‘ विक्की वेलिंगकर’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. संग्राम आणि मी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे, संग्राम यामध्ये विक्कीच्या मित्राची भूमिका साकारत आहे आणि तो एक हॅकर आहे. त्याची भूमिका ही मैत्रीसाठी जीवाला जीव लावणारं', असं हे पात्र आहे. मला संग्रामबरोबर काम करताना खूप मज्जा आली असे सोनाली कुलकर्णी म्हणाली. 

ह्रतिकच्या व्हॅनिटी व्हॅनची एक भिंत गणितातल्या समिकरणांनी भरलीये

'विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे, त्याचबरोबर स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत आहे. या चित्रपटात विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, आणि रमा जोशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.