पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्याला चाहतीकडून त्रास, कौटुंबिक जीवनावर परिणाम

संग्राम समेळ

अनेकदा कलाकारांना  मर्यादा ओलांडून वागणाऱ्या चाहत्यांचा नाहक त्रास होतो. या त्रासातून  कलाकारांना मनस्ताप सहन करावा लागतो. असाच चाहत्यांचा वाईट अनुभव मराठी अभिनेता संग्राम समेळला आला. एक चाहती संग्रामला मेसेज करुन सतत त्रास देत असल्याचं समोर आलं आहे. 

अग्गबाई! सासूबाईंचं ठरलं लग्न, सूनबाई शुभ्रा होणार करवली

''अभिनेत्यानं फेसबुक लाइव्ह करुन चाहत्यांना ही माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून एक चाहती मला त्रास देते आहे. स्वीटी सातारकर असं या चाहतीचे नाव असून  दिवसाला ती मला साडेतीनशे ते चारशे मेसेज करते. यामुळे माझ्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावरही परिणाम होत आहे. या त्रासानं आता मर्यादा ओलांडली आहे. मी सर्व प्रयत्न करुन पाहिले, मात्र नाईलाजानं मला फेसबुकच्या माध्यमातून ही बाब लोकांपर्यंत पोहोचवावीशी वाटते.' असं संग्रामनं म्हटलं आहे. 

Happy Birthday : गुडलकचा राजा!

हा व्हिडिओ संबधीत मुलीच्या कुटुंबीयांपर्यंत किंवा नातेवाईकांपर्यंत पोहोचला तर मला होणारा नाहक त्रास थांबेल, तसेच त्या मुलीलाही समजवता येईल अशीही विनंती संग्रामनं केली आहे.