जनता कर्फ्यूदिवशी अभिनेत्री सना सईदच्या वडिलांचा मृत्यू झाला, मात्र कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत अडकलेल्या सनाला वडिलांना शेवटचंही पाहता आलं नाही. कुछ कुछ होता है फेम सना ही स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटात दिसली होती. २२ मार्चला तिच्या वडिलांचे निधन झाले, मात्र लॉकडाऊन असल्यानं तिला भारतात परतता आले नाही. गेल्या महिन्यात एका कार्यक्रमासाठी ती अमेरिकेत गेली होती.
कोरोनाशी लढाई: २.२ अब्ज लोकांकडे सतत हात धुवायला पाणीच नाही
माझ्या वडिलांना मधूमेहाचा त्रास होता, त्याचप्रमाणे ते आजारांनीग्रस्त होते. अमेरिकत सकाळी ७ वाजता मला त्यांचा फोन आला. मला तातडीनं घरी परतायचं होतं, माझ्या आईला आणि बहिणीला माझी सर्वाधिक गरज होती. ज्यावेळी बाबा जग सोडून गेले तेव्हा बाहेर परिस्थीती खूपच गंभीर होती. पण बाबांनी गेल्या काही काळात खूप सोसलं आता नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल, अशी प्रतिक्रिया सनानं स्पॉट बॉय ईशी बोलताना दिली.
चित्रीकरण बंद असलं तरी 'राधे'च्या क्रू मेंबरला दिले सलमाननं पैसे
सनाच्या वडिलांचे २२ मार्च रोजी अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यादिवशी जनता कर्फ्यू होता माझ्या कुटुंबीयांच्या हातात केवळ तीन तासांचा अवधी होता त्यामुळे लगेच बाबांचे अंत्यसंस्कार करण्यात आले असंही तिनं सांगितलं.