पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Dabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला

दबंग ३

अभिनेता सलमान खाननं त्याच्या बहुचर्चित अशा 'दबंग ३' चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या रॉबिन हुड स्टाइलनं प्रेक्षकांची मनं जिंकणारा  पोलिस अधिकारी चुलबुल पांड्ये दबंग  कसा झाला याची गोष्ट 'दबंग ३' मध्ये पाहायला मिळणार आहे. 

'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'

पहिल्यांदा २०१० मध्ये 'दबंग' चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर  'दबंग २'  आला. या दोन्ही चित्रपटांनी अक्षरश: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता बऱ्याच वर्षांनी 'दबंग ३' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'

या चित्रपटाचा ट्रेलर अल्पावधितच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे सई मांजरेकर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.