पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानचा बाऊन्सर राहिलेल्या व्यक्तीची दूरवस्था, मुरादाबादमध्ये रस्त्यावर घातला गोंधळ

अनस कुरेशीने रस्त्यावर गोंधळ घातला

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील मुगलपुरा भागात एका बाऊन्सरने मद्यपानाच्या नशेमध्ये गुरुवारी जोरदार गोंधळ घातला. मिळालेल्या माहितीनुसार अनस कुरैशी असे या बाऊन्सरचे नाव असून, तो पूर्वी अभिनेता सलमान खानकडे बाऊन्सर म्हणून कार्यरत होता. अनस कुरैशीने गुरुवारी मुगलपुरामधील रस्त्यावर मोठा गोंधळ घातला. त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना मारहाण तर केलीच पण त्याबरोबरच काही गाड्यांची तोडफोडही केली. पोलिसांनी खूप मेहनतीने स्थानिकांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी बरैलीतील मानसोपचार रुग्णालयात करण्यात आली.

पूरग्रस्तांच्या रोषानंतर चंद्रकांत पाटलांनी घेतला काढता पाय

अनस कुरेशी पूर्वी मुंबईमध्ये राहायला होता. त्यावेळी त्याने सलमान खानच्या बाऊन्सरच्या टीममध्ये काम केले होते. सध्या तो एका राजकीय नेत्याकडे बाऊन्सर म्हणून कार्यरत होता. दहा दिवसांसाठी तो गावी आला होता. मुरादाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर मुरादाबाद चॅम्पियनशीप स्पर्धेमध्येही त्यांने सहभाग घेतला होता. त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यायामासाठी जाण्यापूर्वी अनसने एस्ट्रोराइट नावाचे औषध घेतले होते. व्यायामशाळेत जास्त वजन उचलता यावे, यासाठी हे औषध घेतले जाते. 

...तर टी-२० चे नेतृत्व रोहितकडे द्यावे : युवराज सिंग

औषधाचा डोस जास्त झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यामुळे गुरुवारी सकाळी त्याने रस्त्यावरील लोकांना मारहाण कऱण्यास सुरुवात केली. साधारणपणे अर्धातास त्याने रस्त्यावर गोंधळ घातला. यानंतर पोलिस घटनास्थळी आले. पण आलेल्या पोलिसांना अनस कुरेशीला ताब्यात घेणे जमले नाही. त्यानंतर आणखी पोलिस बळ बोलावण्यात आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन मनोरुग्णालयात पाठविण्यात आले.