पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर मग सलमान खानवरही सिने एम्प्लॉईज संघटना बंदी घालणार

मिका सिंग आणि सलमान खान

कराचीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला म्हणून गायक मिका सिंग याच्यावर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने बंदी घातली आहे. पण आता मिका सिंग याच्यासोबत कोणत्याही कलाकाराने काम केले तर त्याच्यावरही बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 'मिड डे'ने या संदर्भातील वृत्त दिले आहे. येत्या काही दिवसांतच अभिनेता सलमान खान मिका सिंग याच्यासोबत अमेरिकेतील एका कार्यक्रमात परफॉर्म करणार आहे. मग फेडरेशनकडून त्याच्यावरही बंदी घातली जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

२२ ऑगस्टला मनसेचं 'चलो ईडी कार्यालय', पण शांततेत

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे सरचिटणीस अशोक दुबे यांनी 'मिड डे'ला सांगितले की, जर आम्ही बंदी घातली तर आमच्या संघटनेतील तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक, स्पॉट बॉय हे कुणीच त्या व्यक्तीसोबत काम करणार नाहीत. आम्ही मिकासोबत काम करीत नाही. जर या काळात कोणी मिकासोबत काम केले तर मग तो सलमान खान असू दे की अन्य कोणता कलाकार त्याच्यावरही बंदी घातली जाईल.

चिथावणीखोर वक्तव्य; नाईकला मलेशियात भाषण करण्यास बंदी

दरम्यान, अमेरिकेतील आयोजकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी ही बंदी लागू होणार का, यावर अशोक दुबे म्हणाले, आमचे धोरण एकदम स्पष्ट आणि साधे आहे. ज्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यासोबत आम्ही काम करणार नाही. कार्यक्रम कुठेही असू दे आणि आयोजक कोणीही असू दे. आम्ही कोणाला कार्यक्रम आयोजित करण्यापासून रोखू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.