पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन : पुतण्याच्या अंत्यदर्शनासाठीही न जाऊ शकल्यानं सलमान दु:खी

सलमान खान- अब्दुल्ला

गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सलमान खानचा पुतणा अब्दुल्ला खान याचं सोमवारी रात्री उशीरा निधन झालं. मात्र पुतण्याच्या अंत्यदर्शनासाठीही न जाऊ शकल्यानं खान कुटुंबीय दुखात आहे. चित्रीकरण बंद असल्यानं दोन आठवड्यांपूर्वीच सलमानचं संपूर्ण कुटुंब पनवेलमधील फार्महाऊसमध्ये राहायला गेलं. त्यानंतर पुढील आठवड्यात पंतप्रधानांनी देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊन असल्यानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर कोणालाही प्रवासाची मुभा नाही. म्हणूनच अब्दुल्लाला भेटण्यासाठी खान कुटुंबीय येऊ शकलं नाही.

कोरोनाशी लढा: आर्थिक मदत करणाऱ्या कलाकारांचे पंतप्रधानांकडून कौतुक

अब्दुलाचे पार्थिव त्याच्या घरी इंदूरला नेण्यात येणार आहे. अब्दुला हा  मुंबईत राहायचा. त्याचं पार्थिव रुग्णवाहिकेतून इंदूरला नेण्यात येणार आहे तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती मुंबई मिररनं दिली. अब्दुलाला शेवटचं पाहता आलं नाही म्हणून सलमानही खूप दु:खी आहे अशी माहिती सलमानचे मॅनेजर जॉर्डी पटेल यांनी दिली. प्रवासबंदी उठल्यानंतर सलमान स्वत: जाऊन  अब्दुल्लाच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे असंही पटेल यांनी सांगितलं.

कोरोनाविरोधात लढा : लतादीदींकडून राज्यासाठी २५ लाखांची मदत