पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फिल्म इंडस्ट्रीतल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या २५ हजार लोकांसाठी सलमान खानची आर्थिक मदत

सलमान खान

कोरोना विषाणूमुळे फिल्म इंटस्ट्रीतील  सर्व प्रकारचं चित्रीकरण बंद आहे. या इंटस्ट्रीत हजारो लोकांचं पोट हे हातावर आहे. चित्रीकरणच बंद असल्यानं इथल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. यातल्या २५ हजार लोकांना  अभिनेता सलमान खान आर्थिक सहाय्य करणार आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ वेर्स्टन इंडियन सिने एम्पॉइज (FWICE ) संघटनेनं दिली आहे. सलमानच्या बीईंग ह्युमन या संस्थेद्वारे ही  मदत केली जाणार आहे, यासाठी सलमानच्या संस्थेनं आमच्याशी संपर्कदेखील साधला, असल्याची माहिती FWICE चे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी दिली. 

'गरजूंचं चांगलं व्हावं', CM relief fund ला सोनाली कुलकर्णीची मदत

'इथे रोजंदारीवर काम करणारे जवळपास ५ लाख कर्मचारी आहेत. त्यातल्या २५ हजार लोकांना तातडीनं आर्थिक सहाय्याची गरज आहे. सलमानच्या बीईंग ह्युमन या संस्थेनं आमच्याशी तीन दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. या क्षेत्रात हातावर पोट भरत असलेल्या अत्यंत गरजूंना मदत करण्याची तयारी या संस्थेनं दाखवली होती. या संस्थेनं २५ हजार लोकांची जबाबदारी उचलण्याचं मान्य केलं आहे. या लोकांची सर्व काळजी आम्ही घेऊ असंही संस्थेनं आम्हाला सांगितलं. यासाठी कामगारांच्या बँक खात्यांचे नंबर त्यांना पुरवण्यात आले आहे.  आर्थिक मदत ही थेट त्यांच्या बँक खात्यात जाणार आहे,  अशी माहिती बी.एन. तिवारी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

बॅकस्टेज काम करणाऱ्यांसाठी मराठी कलाकारांचा मदतीचा हात

तर अक्षय कुमारनं कोरोनाविरोधात लढण्यासाठी २५ कोटी दिले आहेत.  राजकुमार राव  आणि मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी निधी देऊ केला आहे.