पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दबंग ३'च्या टीमनं साजरा केला सई मांजरेकरचा वाढदिवस, आई झाली भावूक

सई मांजरेकरचा वाढदिवस, आई झाली भावूक

'दबंग ३' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सई मांजरेकरचा चित्रपटाच्या टीमनं  मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. सई ही दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते  महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. सलमानसोबत तिनं 'दबंग ३'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

'दबंग ३'च्या टीमनं सईसाठी पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठी सईचे वडील महेश मांजरेकर आणि आई अभिनेत्री मेधा मांजरेकरही उपस्थित होती. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हासोबत मिळून सईनं केक कापला. सईची आई मेधा यावेळी भावूक झालेल्या पहायला मिळाल्या. हा भावनिक क्षण कॅमेरातही कैद झाला.

सीएसएमटी स्थानकातील तिकीट घरात कंगना रेल्वे प्रवाशांच्या सेवेत

सलमानच्या 'दबंग ३'नं ८० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. सईची भूमिका लहान असली तरी तिच्या  अभिनयाला समीक्षक आणि प्रेक्षकांनीही दाद दिलेली पहायला मिळाली. 

विशेष म्हणजे या चित्रपटात सईसोबत तिचे आई वडिल मेधा आणि महेशही दिसले. लेकीच्या पदार्पणाच्या चित्रपटात पालकांचीही त्यात भूमिका असणं, असं चित्र बॉलिवूडमध्ये क्वचितच पाहायला मिळतं. 

आजारी असल्यानं बच्चन अनुपस्थित, २९ डिसेंबरला करणार पुरस्कार प्रदान