पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छोट्या चाहत्याशी गैरवर्तन करणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या सलमाननं लगावली कानशिलात

सलमान खान

 सलमान खानचा 'भारत' चित्रपट ईदच्या दिवशी  प्रदर्शित झाला. गेल्या वर्षभरापासून सलमानचे चाहते  या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. सलमाननं ईदच्या दिवशीच बॉलिवूडसाठी या चित्रपटाच्या प्रिमियरचं आयोजन केलं होतं. बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी या प्रिमियरसाठी उपस्थित होते. सलमानला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली होती. या चाहत्यांमध्ये काही लहान मुलंही होती.

या गर्दीत लहानमुलाशी गैरवर्तन करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाच्या कानशिलात सलमाननं  लगावली असं समजत आहे.  लहान मुलांशी  गैरवर्तन करणाऱ्या सुरक्षारक्षकाला खडसावतानाचा सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या  व्हिडिओवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया  उमटत आहेत. सलमाननं गुरूवारी आयोजित केलेल्या प्रिमियरसाठी कतरिना कैफ, सुनील ग्रोव्हर, दिशा पटानीसह बॉलिवूडमधले अनेक कलाकार उपस्थित होते या दरम्यानच चित्रपटगृहाच्या बाहेर हा प्रकार घडला  असल्याचं म्हटलं जात आहे. 

दरम्यान सलमानच्या चित्रपटानं प्री बुकिंगमधून सर्वाधिक  कमाई करण्याचा विक्रमही रचला आहे. 'भारत' चित्रपटानं प्री बुकिंगमधून २४ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे प्री बुकिंगमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या सहा चित्रपटांच्या यादीत सलमानच्या 'भारत'चाही समावेश झाला आहे.