पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भन्साळींच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटात दिसणार होते शाहरुख- सलमान, पण...

सलमान- शाहरुख

सलमान - शाहरूख  म्हणजे बॉलिवूडमधली 'करण- अर्जुन'ची जोडी. घनिष्ट मित्र असलेल्या या जोडींमध्ये मध्यंतरी मोठा वाद झाला. दोघांमधूनही विस्तव जात नव्हता. आता या जोडीत सारं काही आलबेल आहे. गेल्यावर्षी आलेल्या शाहरूखच्या 'झिरो' चित्रपटात सलमाननं पाहुण्या कलाकाराची  भूमिका साकारली होती. हे दोघंही संजय लीला भन्साळींच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटात दिसणार होते. दोघांनी चित्रपटासाठी होकारही दिला होता मात्र नेमकी माशी कुठे शिंकली, हा चित्रपट का झाला नाही यामागचं कारण निर्माते निखिल द्विवेदी यांनी सांगितलं आहे. 

फोर्ब्समध्ये कंगनाच्या उत्पन्नाचे आकडे चुकीचे?, बहिणीनं मागितला पुरावा

'सलमान आणि शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जवळजवळ निश्चित झाला होता.  दोघांनीही एकत्र काम करण्यास होकारही दिला होता. मात्र मला वाटतं भन्साळींना उत्तरार्ध आवडला नाही. ते चित्रपटाच्या उत्तरार्धातील कथेवर असमाधानी होते. त्यांना या कथेवर काम करण्यासाठी वेळ हवा होता. याला बराच वेळ गेला. हा चित्रपट कधीही झाला नाही', असं निखिल मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

बंटी और बबली २' मध्ये दिसणार सैफ - राणीची जोडी

त्यानंतर भन्साळींच्या 'इन्शाअल्लाह'साठी सलमानला विचारण्यात आलं. आलिया भट्टचीही सलमानसोबत प्रमुख भूमिका होती. मात्र काही कारणानं  'इन्शाअल्लाह'चं चित्रीकरण सुरु होण्यास काही दिवस उरले असताना सलमाननं या चित्रपटातून माघार घेतली. नंतर भन्साळींनी हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Salman Khan Shah Rukh Khan film with Sanjay Leela Bhansali producer reveals what went wrong