पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आतापर्यंत मला कोणीही लग्नाची मागणी घातली नाही- सलमान खान

सलमान खान

अभिनेता सलमान खाननं वयाची पन्नाशी कधीच ओलांडली आहे. मात्र अजूनही तो सिंगलच आहे. सलमानसोबत बॉलिवूडमध्ये करिअर सुरू केलेल्या बहुतेक सर्वच अभिनेत्यांची लग्न झाली, काहींची मुलंदेखील या क्षेत्रात आली आहे. मात्र सलमान घर- संसाराच्या मार्गापासून खूपच दूर आहे. तू लग्न कधी करणार? असा प्रश्न हजारदा सलमानला विचारला गेला आहे. यापूर्वी सलमानचं नाव कतरिना कैफसह अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. सलमान बरेचदा त्याची कथित रशियन प्रेयसी लुलिया वंतूरसोबतही दिसतो. मात्र आतापर्यंत एकाही मुलीनं आपल्याला लग्नाची मागणी घातली नाही, असं सलमानचं म्हणणं आहे. 

'दे धक्का २' येतोय

सलमानचा 'भारत' चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला.  या चित्रपटात कतरिनानं सलमानला लग्नाची मागणी घातली असं एक दृश्य आहे. मात्र खऱ्या आयुष्यात माझ्यासोबत असं घडलं नाही, मला कोणीही  लग्नाची मागणी घातली नाही असं सलमान फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.  'मी कधीही कँडल लाइट डिनरचं आयोजन केलं नाही, मेणबत्तीच्या उजेडात मी काय खातोय हे मला दिसतच नाही म्हणून कदाचित मला कोणीही लग्नाची मागणी घातली नाही, पण याबद्दल अनेकदा मला वाईट वाटतं,  असं सलमान गंमतीनं या मुलाखतीत म्हणाला. 

युवांसाठी २६ जुलैला चित्रपटगृहात 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'चा मोफत शो

सलमान जरी ही गोष्ट नाकारत असला तरी, बॉलिवूडमध्ये आतापर्यंत त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. सलमान अनेकदा कथित रशियन प्रेयसी लुलिया वंतूरसोबतही दिसतो. लुलियादेखील खान कुटुंबीयांच्या अनेक कार्यक्रमात आवर्जुन दिसते.