पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ईदला अक्षय- सलमानची टक्कर अटळच

सलमान अक्षय टक्कर अटळ

कितीही प्रयत्न केले तरी २०२० च्या ईदला अक्षय आणि सलमान खानची टक्कर अटळ असणार असंच चित्र दिसतंय. ईद आणि सलमान खान हे  समीकरण जूने आहे. ईदच्या दिवशी आपल्या चाहत्यांसाठी सलमान नवे चित्रपट घेऊन येतो. यापूर्वी ईदला सलमान-  आलियाचा  'इंशाअल्लाह' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी ईदला प्रदर्शित होणाऱ्या अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'सूर्यवंशी'ची तारीखही बदलण्यात आली होती.

बेघरांसाठी प्रार्थना करा, दिल्ली प्रदूषणाविषयी प्रियांकाची चिंता

त्यामुळे सलमानपुढे अक्षयचंही काही  चालेना असं म्हणत सोशल मीडियावर  अक्षय कुमारला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र सलमानचा 'इंशाअल्लाह' चित्रीकरणाआधीच बंद झाला आहे. हा चित्रपट न काढण्याचा निर्णय संजय लिला भन्साळींनी घेतला आहे. ऐनवेळी 'इंशाअल्लाह' रद्द झाल्यानं ईदच्या दिवशी सलमानचा  'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाऊ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'अप्सरा धारा ' इजिप्तमध्ये चित्रित झालेला पहिला कोकणी चित्रपट

 अक्षयचा 'सूर्यवंशी' जरी ईदला प्रदर्शित होत नसला तरी त्याचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट ५ जून २०२० ला प्रदर्शित होत आहे.  यापूर्वी अक्षय आणि सलमानची बॉक्स ऑफिसवर टक्कर टाळण्याचा प्रयत्न झाला  होता. मात्र यावेळी 'लक्ष्मी बॉम्ब' आणि 'राधे' एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यानं टक्कर पाहायला मिळणार हे नक्की.